पुणे शहरातील आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या कमकुवत समाज घटकातील गुणी मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासाच्या हेतूने १९७९ साली स्थापन झालेल्या संस्थेचे चऱ्होली येथे हे विस्तार केंद्र उभे राहिले आहे. पुणे येथे संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे अनौपचारिक शैक्षणिक प्रकल्प आणि उपक्रम चालविले जातात. यामध्ये बालवाडी, शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी चालणारे एकात्मिक विकास केंद्र, तरुण मुलामुलींसाठी स्वयंअध्ययन केंद्र, ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चालणारी फिरती विज्ञान तंत्रज्ञान प्रयोगशाळा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, गरजू महिलांसाठी विविध उद्योग शिक्षण वर्ग असे अनेक प्रकल्प आणि उपक्रम आहेत. या सर्व प्रकल्पांचा हजारो जणांना गेल्या ४० वर्षाहून अधिक काळ लाभ मिळतो आहे.
समाजातील गरजू मुली आणि महिला यांना उद्योगशिक्षण वर्गांच्या माध्यमातून १९८९-९० पासून संस्थेने जे साह्य केले त्याचा अतिशय अभिमान वाटावा असा परिणाम शेकडो घरांमधून अनुभवता आला. ५००० हून अधिक महिला आत्मनिर्भर होऊ शकल्या आहेत. एका आत्मनिर्भर मुलीमुळे किंवा महिलेमुळे संपूर्ण घराला सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळतात. संपूर्ण घराला सुखाचा सहवास मिळायला लागतो. हे लक्षात घेऊन सर्व विश्वस्तांनी उद्योगशिक्षण विषयासाठी एक स्वतंत्र केंद्र उभे करण्याचे ठरवले. या पार्श्वभूमीवर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. पुरुषोत्तमभाई श्रॉफ यांनी त्यांची चऱ्होली बुद्रुक येथे असलेली एक एकर जागा २००७ साली संस्थेला दानपत्राने दिली आणि मोठ्या विस्ताराचे पाऊल पुढे पडले.
ऑपरेशन थियेटर तंत्रज्ञ, मेडिकल रेकॉर्ड आणि हेल्थ इन्फर्मेशन तंत्रज्ञ, फॅशन डिझायनिंग डिप्लोमा, फिजिओथेरपी डिप्लोमा.
चहोली आणि आसपासच्या परिसरातील निवासी क्षेत्रांतील लोकांना व्यावसायिक कौशल्ये मिळवण्याचा फायदा.
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची मान्यता प्राप्त बांधकाम व प्रशिक्षण सुविधा.
५०००+ महिलांची आत्मनिर्भरता, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबात सकारात्मक बदल घडले आहेत.
तीन मजल्यांचे प्रशिक्षण संकुल, आधुनिक शिक्षण व संसाधन सुविधा.
अग्निवीर आणि कथ्थकनृत्यवर्ग या नवे उपक्रम, ज्यामुळे प्रशिक्षण क्षेत्रात आणखी वाढ होईल.