'Swa'-Roopwardhinee

Selfless Service & Nurturing Value

Home
Selfless Service & Nurturing Value
उत्थान प्रकल्प

समर्पणातून समाजसेवा, प्रेमातून प्रगती

उद्दिष्ट – ‘स्व’-रूपवर्धिनी परिवारातील कार्यकर्त्यांनी समाजातील उपेक्षित स्तरातील घटकांचे प्रश्न समजून घ्यावेत, त्यांचा जीवनप्रवास अनुभवावा आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपले योगदान द्यावे हा संस्कार रुजावा या उद्देशाने पहाट प्रकल्पाची सुरुवात २०१८ साली झाली.

कार्यवाही – पहाट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात कोंडूर व डावजे गावातील कातकरी वस्त्यांमध्ये महिलांशी कुक्कुटपालनाद्वारे कामाचा श्रीगणेशा झाला. दर रविवारी या गावातील तसेच जातेडे, आंदगाव, भोडे, वातुंडे व लव्हार्डे येथील वस्तींमध्ये ही संपर्क झाला. २०१८ ते २०२२ पर्यंत दिवाळी फराळ वाटप, धान्य वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर अशा उपक्रमांतून या बांधवांशी नाते दृढ होण्यास मदत झाली. किशोरवयीन मुला-मुलींसाठी व्यायाम, खेळ, अभ्यास पूरक उपक्रम, कला कौशल्यांवर आधारित उपक्रम घेण्यात येतात.

विशेष उपक्रम – नवरात्र उत्सवात श्री मंदार परळीकर यांनी वस्तीतील देवीसमोर गोंधळ सादर केला. वस्तीतील मुलांची निळकंठेश्वरला सहल झाली.

साध्य – मुलांसोबत त्यांचं नैसर्गिक जीवन जगण्याचा अनुभव कार्यकर्त्यांना मिळाला. संपर्क हा वर्धिनीच्या कामाचा आत्मा आहे. घरोघरी व्यक्तिशः संपर्कातून वस्ती व कार्यकर्त्यांमधील प्रेम दृढ होते. दुर्गम रस्ते, प्रतिकूल हवामान, इतर सुविधांचा अभाव असतानाही न थकता सर्वजण कामाचा आनंद घेतात.

“प्रेम जो केवल समर्पण भाव को ही जानता है। और उसमे ही स्वयं की धन्यता बस मानता है। दिव्य ऐसे प्रेम मे ईश्वर स्वयं साकार है। शुद्ध सात्विक प्रेम अपने, कार्य का आधार है।”
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका

स्पर्धा परीक्षांसाठी अनुभवी मार्गदर्शन, उज्ज्वल भवितव्याची दिशा

‘स्व’-रूपवर्धिनी संस्थेने 2000 साली स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली. याचे मुख्य ध्येय सामाजिक बांधिलकी जपणारे, प्रामाणिक व तळमळीचे अधिकारी घडविणे आहे. केंद्रात सुसज्ज संदर्भ ग्रंथालय, प्रशस्त अभ्यासिका, आणि सुयोग्य मार्गदर्शनाची सोय आहे. 2011 पासून शिष्यवृत्ती बॅच सुरू केली असून, यामध्ये 50 विद्यार्थ्यांची विशेष निवड केली जाते. या विद्यार्थ्यांना मोफत तासिका, अभ्यासिका सुविधा आणि आवश्यक त्या सर्व साहित्याची सोय केली जाते. या केंद्राच्या माध्यमातून ‘कमवा आणि शिका’ या योजनेतर्गत आर्थिक मदतीची सुविधाही उपलब्ध आहे, ज्यामुळे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे येऊ नयेत. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी केंद्रात विशेष मार्गदर्शन शिबिरे, तज्ज्ञ व्याख्याने, आणि चर्चा सत्रांचे आयोजन केले जाते. राज्यसेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांचे मेळावेही आयोजित केले जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे अनुभव आणि प्रेरणा मिळते. केंद्राच्या विशेष उपक्रमांमध्ये नियमित चाचण्या, समूह चर्चा, अभ्यास साहित्याची उपलब्धता आणि वेळोवेळी समुपदेशन यांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी आवश्यक सर्व मार्गदर्शन व संसाधने मिळतात. केंद्राच्या या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते आणि ते समाजात सकारात्मक बदल घडविण्याच्या दिशेने प्रेरित होतात.
रुपरंग वा असो गंधही | यातील माझे काहीच नाही |
श्रेयाचा मज नको लेशही | निर्माल्यात विरावे ||
विकसित व्हावे, अर्पित होऊन जावे ||
संपर्क

Call us

+९१ ९०११३८६३८६

Mail Us

relations@swaroopwardhinee.org

Time

सकाळी 11 ते संध्याकाळी 6

पत्ता

'स्व' रूपवर्धिनी 22/1, मंगळवार पेठ, पारगे चौक, बारणे रोड पुणे - 411011, महाराष्ट्र, भारत.

©2024 ‘Swa’-Roopwardhinee | All Rights Reserved. Made with 🤍 by the Social Digital Wings.