आर्थिक वैशिष्ट्ये – कोणत्याही शासकीय मदतीशिवाय हे काम गेली ४४ वर्षाहून अधिक काळ चालू आहे आणि विस्तारते आहे. समाजाने दिलेल्या आर्थिक पाठबळामुळे हे शक्य आहे. या ४४ वर्षांमध्ये मिळालेल्या मदतीपैकी ‘उपेक्षित प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास’ या मूळ उद्दिष्टाच्या पूर्तीच्या दृष्टीने जे कार्यक्रम, उपक्रम झाले त्यावर अधिक रक्कम खर्च झाली आहे.
आवाहन – कोणतेही शासकीय अनुदान न घेता केवळ समाजातील सहृदय व्यक्ती आणि संस्थांच्या आर्थिक सहयोगाने वर्धिनीचे काम प्रगती करत आहे. ‘स्व’ रूपवर्धिनीचा उद्देश व आजवरची वाटचाल आपल्या समोर मांडली आहे. समाजामध्ये आशादायी चित्र निर्माण करण्यासाठी वर्धिनीसारख्या कामांची नितांत गरज आहे असे आम्हाला प्रामाणिकपणे वाटते. हा विचार योग्य आहे असे आपल्याला जर वाटत असेल तर आपल्या साहाय्याची आम्ही आतुरतेने वाट पाहात आहोत.
आपण पुढील प्रमाणे साहाय्य करू शकता
वर्धिनीच्या चालू असलेल्या किंवा आगामी योजनांमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
वर्धिनीच्या कामाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी साहाय्य.
वर्धिनीचे काम सुरळीतपणे चालू राहण्यासाठी आणि विस्तारण्यासाठी आपल्या शक्यतेप्रमाणे अधिकाधिक आर्थिक साहाय्य.
आपल्या सवडीनुसार आपल्या प्राविण्य क्षेत्रातील विषयांचे विद्यार्थ्यांना अध्यापन.
वर्धिनीच्या वर्धक आणि युवा कार्यकर्त्यांचे प्रगती पालक (Mentor) या भूमिकेतून कार्य.
समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींची तसेच अर्थसाहाय्य करू शकणाऱ्या व्यक्ती व संस्था यांची संस्थेच्या कामाशी जोडणी करून देणे.
बँक खाते माहिती
NAME OF THE BANK : BANK OF INDIA BRANCH : RASTAPETH BRANCH ACCOUNT NO:051010110002098 IFSC CODE: BKID0000510
रुपरंग वा असो गंधही | यातील माझे काहीच नाही |
श्रेयाचा मज नको लेशही | निर्माल्यात विरावे ||
विकसित व्हावे, अर्पित होऊन जावे ||