उद्दिष्ट – ‘स्व’-रूपवर्धिनी परिवारातील कार्यकर्त्यांनी समाजातील उपेक्षित स्तरातील घटकांचे प्रश्न समजून घ्यावेत, त्यांचा जीवनप्रवास अनुभवावा आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपले योगदान द्यावे हा संस्कार रुजावा या उद्देशाने पहाट प्रकल्पाची सुरुवात २०१८ साली झाली.
कार्यवाही – पहाट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात कोंडूर व डावजे गावातील कातकरी वस्त्यांमध्ये महिलांशी कुक्कुटपालनाद्वारे कामाचा श्रीगणेशा झाला. दर रविवारी या गावातील तसेच जातेडे, आंदगाव, भोडे, वातुंडे व लव्हार्डे येथील वस्तींमध्ये ही संपर्क झाला. २०१८ ते २०२२ पर्यंत दिवाळी फराळ वाटप, धान्य वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर अशा उपक्रमांतून या बांधवांशी नाते दृढ होण्यास मदत झाली. किशोरवयीन मुला-मुलींसाठी व्यायाम, खेळ, अभ्यास पूरक उपक्रम, कला कौशल्यांवर आधारित उपक्रम घेण्यात येतात.
विशेष उपक्रम – नवरात्र उत्सवात श्री मंदार परळीकर यांनी वस्तीतील देवीसमोर गोंधळ सादर केला. वस्तीतील मुलांची निळकंठेश्वरला सहल झाली.
साध्य – मुलांसोबत त्यांचं नैसर्गिक जीवन जगण्याचा अनुभव कार्यकर्त्यांना मिळाला. संपर्क हा वर्धिनीच्या कामाचा आत्मा आहे. घरोघरी व्यक्तिशः संपर्कातून वस्ती व कार्यकर्त्यांमधील प्रेम दृढ होते. दुर्गम रस्ते, प्रतिकूल हवामान, इतर सुविधांचा अभाव असतानाही न थकता सर्वजण कामाचा आनंद घेतात.